[email protected]

+91 9834619720

चैत्र नवरात्री म्हणजे काय आणि जाणून घेऊयात त्याचे महत्त्व...

चैत्र नवरात्री - या वर्षी बुधवार दिनांक २५ मार्च २०२० रोजी आहे.

सगळ्यांना माहीत असेलच की या वर्षी चैत्र नवरात्री बुधवार दिनांक २५ मार्च २०२० रोजी आहे. परंतु खूप लोकांना याबद्दलची संपूर्ण माहिती माहीत असेलच असे नाही. म्हणूनच तुमच्या आमच्या साठी हा एक छोटासा ग चैत्र नवरात्रीवर लेख. हे वाचल्या नंतर तुम्ही आपल्या पाल्याला नक्कीच व्यवस्थित सांगू शकाल. कदाचित त्याच्या निबंधातही मदत करू शकाल...

चैत्र नवरात्री म्हणजे काय आणि जाणून घेऊयात त्याचे महत्त्व...

चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात ही गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. भारतीय आणि हिंदू पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. हिंदू संस्कृतीमध्ये आणि परंपरेनुसार चार प्रकारची नवरात्र वर्षभरात साजरी केली जातात. यामध्ये दोन नवरात्री ह्या प्रकट तर दोन नवरात्री ह्या गुप्त पद्धतीने ह्यांची आराधना केली जाते . दोन प्रकट नवरात्रांमध्ये चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र यांचा समावेश आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असल्यामुळे या नवरात्राला वासंती नवरात्र असेही म्हणतात. तर अश्विन महिन्यातील नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रालाही अत्यंत महत्त्व आहे.

चैत्र नवरात्री हा हिंदू धार्मिक सण असून, हा सण नारीशक्तीचे प्रतीक आहे. चैत्र नवरात्री हा देवीच्या आराधना करण्याचा सण असून, देवीची आराधना ही वर्षातून दोन वेळा करतात, एक म्हणजे चैत्र नवरात्री ( ह्याला शारदीय नवरात्र देखील म्हणतात) आणि वासंतिक नवरात्र. ह्यामध्ये सलग नऊ दिवस देवीची आराधना करण्यात येते.

हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य जेंव्हा उगवतो, ती तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे चैत्र प्रतिपदा २५ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी नववर्ष सुरू होत असल्यामुळे गुढीपाडवा हा सण साजरा करून नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल. तसेच चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी या दिवशी नवरात्र समाप्त होईल. २ एप्रिल रोजी चैत्र शुद्धनवमी आहे. म्हणजेच चैत्र नवरात्र २५ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत साजरे केली जाईल.

देवीची नऊ रूप खालील प्रमाणे आहेत:

१. शैलपुत्री
२. ब्रह्मचारिणी
३. चन्द्रघंटा
४. कुश्मांडा
५. स्कंदमाता
६. कात्यायनी
७. कालरात्री
८. महागौरी
९. सिद्धिदात्री

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते जे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यानंतर देवीच्या पूजेला सुरुवात केली जाते. इच्छित फल प्राप्तीसाठी ही आराधना केली जाते. त्रेतायुगात श्रीरामांचा जन्म देखील ह्याच दिवशी झाला अशी मान्यता प्रचलित आहे. चैत्र नवमीच्या नऊ दिवसाच्या सोहळ्यामध्ये दुर्गा देवीच्या मूर्ती अथवा फोटोची लाल फूल अर्पण करून पूजा करण्यात येते. ह्या नऊ दिवसात दाढी तसेच केस कापू नयेत अशी मान्यता आहे, तसेच मांसाहार, कांदा, लसुण ह्यांचे सेवन करणे योग्य नाही. चामड्याचे वस्त्र अथवा चामड्या पासुन बनवले गेलेले वस्त्र परिधान करू नये. देवीची पूजा मनोभावे केल्याने इच्छित कामना पूर्ण होते तसेच आर्थिक संकट देखील दूर होते.

शेतकरी लोक ह्या सणाला पीक घ्यायला सुरुवात करतात तर इतर लोक नवी वस्त्रे किंवा साहित्य विकत घेतात.

देवीचे तसेच कुमारी पूजन, होम आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्राचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे.

तुम्हाला अधिक धार्मिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील सुंदर लेख नक्की वाचा.
https://maharashtratimes.indiatimes.com/astro/festival/news/chaitra-navratri-2020-chaitra-navratri-shubh-muhurat-and-significance/articleshow/74709083.cms?story=4

तसेच तुम्हाला जर का आमची माहिती अथवा लेख आवडत असेल तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया मेसेज अथवा कॉमेंट द्वारे नक्की कळवा.
#किड्सफ्यूचर- काळजी प्रत्येक पालकाची आणि त्याच्या पाल्याची.

References:

https://maharashtratimes.indiatimes.com/astro/festival/news/chaitra-navratri-2020-chaitra-navratri-shubh-muhurat-and-significance/articleshow/74709083.cms?story=4
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
Designed by Freepik

#ChaitraNavratri2020 #Chaitra Navaratri #Navratri #2020 #ramnavami #chaitranavratri meaning in marathi #chaitranavratri importance #gudhipadwa #pooja

To Top ↑