[email protected]

+91 9834619720

रामनवमी म्हणजे काय आणि जाणून घेऊयात त्याचे महत्त्व.....

रामनवमी - या वर्षी गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२० रोजी आहे.

चैत्र शुद्ध नवमी हा चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस असतो. ह्याच तिथीला श्री भगवान रामाचा जन्म झाला. हाच दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. श्री रामाचा जन्म हा राणी कौसल्येच्या पोटी झाला, राजा दशरथ आणि राणी कौसल्या हे प्रभू श्री रामाचे पालक होय. श्री रामाचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला, ह्यावेळी रामजन्माचा सोहोळा होतो. श्री रामाला चंपा, चमेली, केवडा आणि जाईची फुले अर्पण केली जातात. ह्या सोहोळ्यात रामाच्या प्रतिमेस किंवा नारळास पाळण्यात ठेवतात आणि पाळणा(गाणी) देखील म्हटला जातो.

रामनवमीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. सर्व मंदिरात - मठात भजन कीर्तन प्रवचन सत्संग इत्यादी सोहळे साजरे करण्यात येतात.

श्री रामाचा जन्म हा चैत्र शुद्ध नवमी ला गुरुवारी पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता आणि ह्याच दिवशी महाकवी तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी तर गीत रामायणाचे गायन तसेच रामायण ग्रंथाचे वाचन हे गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात केल जाते. रामनवमी चे व्रत देखील अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते. ह्या सोहोळ्यात सुंठ हे प्रसाद महत्वाचे आहे .

श्री रामांवर आधारित श्री रामायण होय. ह्यामध्ये एक आदर्श पुत्र - बंधू - मित्र - पती तसेच धर्मरक्षक, कर्तव्यदक्ष, वचन पालनकर्ता, मातृभक्त अश्या ना-ना प्रकारचे श्री रामाचे सर्वोत्तम गुण दर्शविले आहे. श्री रामाने १४ वर्षांचा कठोर वनवास देखील सहन केला आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या वाईट शक्तींचा नाश तसेच बलाढय़ असा लंकाधिपती रावण ह्या राक्षसाचा पराभव केला होता.

हे झाले रामाचे महात्म्य. चला तर आता आपण रामनवमीच्या दिवशी व्रत कसे करायचे हे पाहूयात.

तर रामनवमी व्रत कसे करायचे?

  • चैत्र शुद्ध नवमीला ब्रह्म मुहूर्तावर उठून दैनंदिन कार्यक्रम पूर्ण करावे तसेच घर स्वच्छ करावे.
  • शुद्ध पाणी, गोमूत्र संपूर्ण घरात शिंपडून घर पवित्र करून घ्यावे
  • त्यानंतर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणून ईश्वरप्रती भावना प्रकट करून, संकल्प करावा.
  • घराचे सुशोभीकरण करावे.
  • कलशावर राम सीता आणि भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न तसेच हनुमानाच्या चित्राचे अथवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यांचे यथासांग पूजन करावे.
  • आणि त्यानंतर विधिपूर्वक पूजा संपन्न करावी.
  • (अनेकजण ह्या दिवशी उपवास देखील करतात)
  • श्री रामाचे भजन नामस्मरण तसेच स्तोत्र करावे.
  • दुसर्‍या दिवशी पारायण करून व्रत सोडावे.

अश्या पद्धतीने व्रत केल्यास उचित असे इच्छुक फलप्राप्ती होते असे अनेकांना अनुभव आहे.

राम ह्या शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाशीत, अंत:प्रकाश असा पण एक आहे, अशी प्रभू श्री रामाची अनेक नावे आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.

१. रामभद्राय
२. शाश्वत्य
३. राजीवलोचन
४. जानकी वल्लभ
५. जनार्दन
६. सत्यवर्ता
७. पुरूषोत्तम
ह्या सारखे अनेक नावे आहेत.

रामाची १००० नावे आणि त्याचे अर्थ इंग्रजीमध्ये जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्‍लिक करा. https://www.drikpanchang.com/hindu-names/gods/lord-rama/1000-rama-names.html
तसेच रामाची १०८ नावे आणि त्याचे अर्थ मराठी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्‍लिक करा. https://www.nriol.com/indianparents/lord-rama.asp
https://www.iskconbangalore.org/blog/the-108-names-of-sri-ramachandra/

तसेच तुम्हाला जर का आमची माहिती अथवा लेख आवडत असेल तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया मेसेज अथवा कॉमेंट द्वारे नक्की कळवा.
#किड्सफ्यूचर- काळजी प्रत्येक पालकाची आणि त्याच्या पाल्याची.

References:

https://www.google.com/amp/s/m-marathi.webdunia.com/article/ram-navami-marathi/how-to-celebrate-ramnavmi-vrat-108041200008_1.html%3famp=1
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80
https://www.google.com/amp/s/m-marathi.webdunia.com/ram-navami-marathi%3famp=1
Designed by Freepik

#ChaitraNavratri2020 #Chaitra Navaratri Navami #Ramnavami #2020 #ram navami #ram navami in marathi #ram navami importance #navami meaning #ram #sita #pooja #vrat #marathi #ram Navami 2020 Click here to See this on Facebook:

To Top ↑